Collection of all beloved Articles, Poems, Videos, Music & many more......

कविता / चारोळ्या

काही निवडक.. "मी माझा" मधून (by Chandrashekar Ghokhale)
----------------------------------------------------
तू बुड़ताना मी
तुज्याकडे धावलो, ते
मदतीला न्हवे सोबतीला
नाहीतर....मलातरी कुठे येतय पोहायला.
.................................
आठवणीच्या देशात
मी मनाला कधी पाठवत नाही
जाताना ते खुश असते
पण येताना त्याला येववत नाही
................................
प्रत्तेक गावाबाहेर
छोटा महारवाडा आहे
चवथिच्या पुस्तकात मात्र
समानतेचा धडा आहे
...............................
तुजे हे नेहमीचेच झालय
आल्या आल्या निघण
मी जाते, मी निघते म्हणताना
मी थाम्बवतोय का बघण
...............................
उंच उंच राहून कधी
आभाळही थकत
आणि कुठेतरी जाऊन मग
जमिनीला टेकत
...............................
माज्या मनाचा माज्या मेंदुशी
चात्तिसचा आकड़ा आहे
माजे मन तसे सरळ आहे
या मेंदुचाच रस्ता वाकडा आहे
...............................
पाण्याचे वागणे
किती विसंगत
पोहोनारयाला बुडवून
प्रेताला ठेवत तरंगत
...............................
चढ़ाओढ़ या शब्दाचा अर्थ
आपण किती उल्टा लावतो
कोणी वर चढताना दिसला
की लगेच खाली ओढायला धावतो
------------------------------

प्रत्येकाला एक आभाळ असाव
कधी वाटल तर भरारन्यासथी
प्रत्येकाला एक घरट असाव
संध्याकाळी परतण्यासाठी
-------------------------------
पुन्हा मी माझा.... (२)
..........................................................
तो प्रचंड वड

कसा उन्मालून पडला होता
म्हणे त्याला बिलगलेला
सायलीचा वेल कुणी खुडला होता
------------------------------------
पिम्पलाच रोप कस
कुठेही उगवत
कुठेही उगवत म्हणून
त्याच कसही निभावत
------------------------------------
सर्पनासाठी तोडलेल्या ओंडकयाला
एकदा पालवी फुटली
त्यालाच कलेना
ही जगायची जिद्द कुठली
----------------------------------
तल्याकाठच गवत तल्याशी
सलगिने वागायच कारण
त्याला जगायला
तल्याचच पानी लागायच
---------------------------------
आभाळ अस
ओतल्यासारख वाहिल आणि
घरच्या तुळसिला
पाणी  घालायच राहिल
-------------------------------
वाळक पान गळताना
सांगत, वसंत आता येणार आहे
वसंत ओरडतच येतो
मी लगेचच जाणार आहे
--------------------------------
स्पर्शाला अर्थ असतो
हे कळल्यावर माझे बालपण
मला सोडून गेल आणि जाताना
नविन स्वप्नांशी,नात माझ जोडून गेल
--------------------------------
जेव्हा तू माझा हात
अलगद हाती धरलास ,खरे सांग
तेव्हा तू तुज्याजवळ कितीसा  उरलास
---------------------------------
सगळीच वादळ मी
खिडकित बसून पाहिली,पण
परवाच्या पावसात
माझी खिडकीच वाहिली
--------------------------------
मी बुड़ताना माझा गाव
ओझरता पहिला होता,
मला पहायला गाव माझा
काठावर उभा राहिला होता
--------------------------------
जन्मभर जळल्यावर,
मेल्यावर पण जाळतात
लाकड़ापेक्षा माणसेच
लाकडाचा गुणधर्म पाळतात
-------------------------------
देवलात गेल्यावंर माणसे
दुकानात गेल्यासारखी वागतात
चार-आठ आणे टाकुन
काहिना काही मागतात
------------------------------
इथे वेड असण्याचे
खुप फायदे आहेत
शाहान्यांसाठी जगण्याचे
काटेकोर कायदे आहेत
--------------------------------
तुज्यावर रागावणे
हां तुला आठवण्याचा बहाणा आहे
तू आलास की तू जातोस तसा
माझा राग शहाणा आहे
--------------------------------
तू सोबत असलीश की
मला माझाही आधार लागत नाही ,
तू फक्त सोबत रहा
दुसरे काहीही मागत नाही
--------------------------------
कापरा सारखे जळणे
मला कधीच पटत नाही
तस जळन्यास माझी ना नाही,पण
तसे जळल्यावर शेवटी काहीच उरत नाही
---------------------------------
------------------------------------------------------

काही निवडक आणि आवड़क ...........(कवि : संदीप खरे)   
-------------------------------------------------------------------------------
लव्हलेटर.......

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं
सरळ जाऊन बोलण्यापेक्ष इझी आणि बेटर असतं
गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं
घुसळ घुसळ घुसळलेल्या मनामधलं बटर असतं

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक सॉंग असतं
ज्यातला कंटेंट राईट आणि ग्रामर नेहमीच रॉंग असतं
सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्ट मधली पेन असतं
आणि जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं खिशात पेन नसतं
पटलं तर पप्पी आणि खटकलं तर खेटर असतं!

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे रेअर हॅबिट असतं
वरती वरती लायन आतून भेदरलेलं रॅबिट असतं
शक्य शक्य हातांमधून थथरणारा वर्ड असतं
नुकतंच पंख फ़ुटलेलं क्युट क्युट बर्ड असतं
होपफ़ुल डोळ्यांमधलं ड्रॉप ड्रॉप वॉटर असतं!!

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे ऍग्रीमेंट असतं
५०% सर्टन आणि ५०% चं जजमेन्ट असतं
ऑपोनन्टच्या स्ट्रॅटेजीवर पुढचं सगळं डिपेन्ड असतं
सगळा असतो थेट सौदा काहीसुद्धा लेन्ड नसतं
हार्ट देऊन हार्ट घ्यायचं सरळ साधं बार्टर असतं!!

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक ड्रीम असतं
लाईफ़च्या पेस्ट्रीवरचं स्वीट स्वीट क्रीम असतं
अर्धं अर्धं प्यावं असं शहाळ्यामधलं वॉटर असतं
तिसयासाठी नाहीच असं अगदी प्रायव्हेट मॅटर असतं
-------------------------------------------------------
Blank Call

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
बोलतच नाही मुळी पलीकडे कोणी
ऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी ...(१)


कळताच मलाही मग थोडंसं काही
मीही पुढे मग बोलतंच नाही
फोनच्या तारेतून शांतता वाहते
खूप खूप आतून अजून काही सांगते ...(२)


नदी नि शेतं नि वार्‍याची गिरकी
ढगाची विजेने घेतलेली फिरकी
वाळूवर काढलेली पाण्याची चित्रं
"तुझा" पुढे मी खोडलेला "मित्र" ...(३)


टपला नि खोड्या नि रुसवे नि राग
एकदा तरी सहज म्हणून शहाण्यासारखं वाग
हसायचे ढीगभर नि लोळून लोळून
बोलायचे थोडेच पण घोळून घोळून...(४)


वडाचे झाड आणि बसायला पार
थंडीमधे काढायची उन्हात धार
कॉफी घेउन थोडेसे बोलायचे कडू
हसताना पहायचे येते का रडू ...(५)


बोलायचे गाणे आणि बोलायची चित्रं
नुसतीच सही करुन धाडायची पत्रं
क्षणांना यायची घुंगरांची लय
प्राणांना यायची कवीतेची सय...(६)


माणूस आहेस "गलत" पण लिहितोस "सही"
पावसात भिजलेली कवीतांची वही
पुन्हा नीट नव्याने लिहीत का नाहीस?
काय रे.... काही आठवतय का नाही?
शब्दसुद्धा नाही तरी कळे असे काही
हातामधला हात सुद्धा जितकं बोलत नाही...(७)


हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
दोन्ही कडे अबोला आणि मध्यात कल्लोळ
छाती मधे घुसमटतात हंबरड्यांची लोळ...(८)


ऐकू येतात कोंडलेले काही श्वास फक्त
कोणासाठीतरी खोल दुखलेलं रक्त
गरम होतात डोळे नि थरथरतो हात
सर्रकन निघते क्षणांची कात...(९)


उलटे नि सुलटे कोसळते काही
मुक्यानेच म्हणतो "नको... आता नाही"
फार नाही... चालतो मिनिटे अवघी तीन
तेवढ्यात जाणवतो जन्माचा शीण
तुटत गेले दोर आणि उसवत गेली वीण
डोळे झाले जुने तरी पाणी नविन...(१०)


हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन....
------------------------------------------------------
बॉस .....


बॉस खुप उशिरापर्यंत थांबायचा आणि वैताग आणायचा...
लाल लाल कंटाळल्या डोळ्यांनी काम करत रहायचा...

आम्ही घरी निघालो की चुकचुकायचा...
मी लग्नाळलेला... वाटायचं- 'चांगलं घरी जायचं सोडून

कसलं हे उकरून उकरून काम करत रहाणं !'...
यथावकाश माझं लग्न झालं...
नव्या नवलाईचे पक्षी घरटं सोडेना झाले...
बघता बघता 'अतिपरिचित' झाले....


आणि हळूहळू पंख सैलावत जाताना
घरटयाची हाक आत तेवढीशी तीव्र उरली नाही...


आता बॉसला 'थांब' सांगावं लागत नाही...
केबिनमध्ये तो आणि केबिनबाहेर मी
एकमेकांना सोबत करत बसलेलो असतो...
कंटाळ्यातील भागीदारांच्या समजुतदारपणाने

घरी न जाता काम करत रहाण्याची 'अनिवार्यता'
दोघांनाही आता घट्ट धरून ठेवते...
उकरून उकरून काम करत प्रश्नांशी भांडत बसण्यापेक्षा
उकरून उकरून काम करणे सोपे असते,

हे निर्जन ऑफिसमधल्या सुन्न रात्रींशी
गुपचुप कबुल केलेए आहे मी...
--------------------------------------------------
करु वाटे..


करु वाटे खरे तर तुला एक फोन
यावा वाटे खरे तर तुझा एक फोन
असे काही होत नाही मग उगाचच
याला कर फोन कधी त्याला कर फोन


फोन तुझा सदा चालू कधी बंद नाही
आणि त्याला तारेचाही आता बंध नाही
पक्षापरी निरोपांची हवेतून ये-जा
हातातून तो ही परी झेपावत नाही


हातामध्ये फोन तरी प्रश्ण एवढाच
बोलायचे काय आणि बोलणार कोण
कसा बघ फोन माझा गावोगाव फ़िरे
हातातल्या हातामध्ये एकटाच झुरे


ह्रदयात साठवल्या काही जुन्या खुणा
टाकवेना फोन बाई जरी झाला जुना
पुन्हा पुन्हा करतो मी बटणाशी चाळा
पुन्हा पुन्हा बदलतो रींगरचा टोन !

खिडकीत साधुनिया सिग्नलचा कोन
कसे कसे किती किती बोलायचा फोन!
आता कसा उगामुगा वरवर बोले
जिभेवर जसे काही त्याच्या वारे गेले !


गोड गोड बोलायला एकटा मी पुरे
भाडायला तरी सखे लागतात ना दोन !
-------------------------------------------------
प्रेम म्हणजे प्रेम असत......(कवी: मंगेश पाडगावकर)       

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत
तुमच आणि आमच अगदी सेम असत || ||


काय म्हणता ? या ओळी चिल्लर वाटतात ?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?
असल्या तर असू दे
फसल्या तर फसू दे
तरीसुद्धा...तरीसुद्धा || ||


मराठीतून इश्य म्हणून प्रेम करता येत
उर्दुमधे इश्क म्हणून प्रेम करता येत
व्याकरानात चुकलात तरी प्रेम करता येत
convent मधे शिकलात तरी प्रेम करता येत
love हे त्याचेच दुसर name असत || ||


सोळ वर्ष सरली की , अंगात फूल फुलू लागतात
जागेपणी स्वप्नांचे, झोपाले झुलू लागतात
आठवत ना ? तुमची माझी सोळ जेवा सरली होती
होडी सगळी पाण्याने भरली होती
लाटांवर बेभान होउन नाचलो होतो
होडीसकट बुडता बुडता वाचलो होतो
बुडलो असतो तरीसुद्धा चालल असत
प्रेमानेच अलगद वर काढल असत
तुम्हाला हे कळल होत
मलासुद्धा कळल होत , कारण...|| ||


प्रेमबीम झूठ असत, म्हाननारी माणस भेटतात
प्रेम म्हणजे स्तोम नुसते, माननारी माणस भेटतात
असला एकजण चक्क मला म्हणाला
"आम्ही कधी बायकोला फिरायला नेल नाही"
पांच मूल झाली तरी प्रेमबीम कधीसुद्धा केल नाही
आमच कधी नडल का ?
प्रेमाशिवाय अडल का ?
त्याला वाटल मला पटल
तेवा मी हलकेच म्हटल || ||


तिच्यासोबत पावसात कधी
भिजला असाल जोडीने
एक चोकोलेट अर्ध अर्ध
खाल्ल असाल गोडीने
भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत
तासन तास फिरला असाल
झंकारलेल्या सर्वस्वाने
तिच्या कुशीत शिरला असाल || ||


प्रेम कधी रुसन असत
डोल्यानिच हसन असत
प्रेम कधी भाण्डंत सुद्धा
निळ चांदण सांडत सुद्धा
दोन ओलींची चिट्ठी सुद्धा प्रेम असत
घट्ट घट्ट मीठी सुद्धा प्रेम असत
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत
तुमच आणि आमच अगदी सेम असत || ||
--------------------------------------------------------
यांच अस का होतं .....(कवी: मंगेश पाडगावकर)

यांच अस का होतं कळत नाही
किंवा त्याना कळत पण वळत नाही

निळ निळ वेल्हाळ पाखरू, आभालात उडनार
रुपेरी वेलांटी घेत मासा, पाण्यात बुड्नार
याच सुख नसतच मुळी कधी त्यांच्यासाठी
एकच गोष्ट त्यांची असते "कपालावर आठी"
कधीसुद्धा यांची पापणी ठळट नाही
यांच अस का होतं कळत नाही
किंवा त्याना कळत पण वळत नाही...

मोठ्याने हसा तुम्ही, त्याना नैतिक त्रास होतो
वेलची खाल्लित तरी, याना व्हिश्किचा वास येतो
यांचा घोष सुरु असतो, "अमक खाणे वाईट डोके जडस होत"
तमक पिऊ नका त्याने नक्की पडस होत"
सयमाचे पुतलेच हे, त्यांच मन चुकुनही वळत नाही
यांच अस का होतं कळत नाही
किंवा त्याना कळत पण वळत नाही...

सगलेच कसे बागेमधे व्यायाम करीत बसणार
किंवा हातात गीता घेउन चिंतन करीत बसणार
बागेतल्या कोपरयत कोणी , घट्ट बिलकुन बसतच ना ?
गालाला गाल लाउन, गुल- गुल करीत असतंच ना ?
नैत्तिक सामर्थ्यांच त्यांच्या वेगवान घोड़ असत
पण याना मूल होतात हे एक कोड असत !!
या कठिन कोड्याच उत्तर मात्र मीळत नाही
यांच अस का होतं कळत नाही
किंवा त्याना कळत पण वळत नाही...

कसल्याही आनंदाला ते सतत भीत असतात
एरंडेल प्यावे तसे आयुष्य पित असतात
एरंडेल प्याल्यावर, आणखी वेगले काय होणार ?
एकच क्षेत्र ठरलेल, दुसरीकडे कुठे जाणार?
कारण आणि परिणाम यांच नात टळत नाही
यांच अस का होतं कळत नाही
किंवा त्याना कळत पण वळत नाही...
---------------------------------------------------
 एक कविता...inspire करनारी......

देवासमोर उभा होतो
हताश मी हात जोडून
डोळ्यामधे पाणी होते
मनातून पूर्ण मोडून

                     " देवा!" मी म्हणालो , "काय करू कळत नाही"
                     "प्रश्नआंच उत्तर मिळत नाही"
                    "विश्वास ठेव" देव म्हणाला

"देवा, सगलेच रस्ते बंद आहेत
आशेचे दिवे मंद आहेत
"विश्वास ठेव" देव म्हणाला

                   देवा आज असं वास्तव आहे
                  जिथे आशेचा किरण नाही
                 उदय काही छान असेल
                असा आजचा क्षण नाही
                तर कशावर मी विश्वास ठेवावा
               जगामधे विश्वास आहे
               याचा तुज्याकडे काय पुरावा...?

शांतपणे हसत देव मला म्हणाला....

"पक्षी उडतो आकाशात, आपले पंख पसरून
विश्वास असतो त्याचा खाली नाही पड्न्यावर"

                "मातीमधे बी पेरतो, रोज़ त्याला पाणी देतो
               विश्वास असतो तेवा तुजा रोप जन्म घेण्यावर"
               " बाळ झोपते खुशीत, आईच्या कुशीत
               विश्वास असतो त्याचा, तिने सम्भालुन घेण्यावर"

"उद्याचे बेत बनवतो, रात्री डोळे मिटतो,
विश्वास असतो तेवा तुजा पुन्हा प्रकाश होन्यावर"

"आज माझ्या दारी येऊन, आपल्या मनातल दुःख घेउन,
विश्वास आहे तुजा .....कारण मी हाक एकन्यावर"
                      "असाच विश्वास जागव मनात,परिस्थिति बदलते एका क्षणात"

            "आजची स्थिती अशीच राहील, असं कुठेही लिहिलेले नाही
              उदयाच चित्र कसं असेल, तू काहीच पाहिलेले नाही"

"जिथवर तुझी दृष्टि आहे, त्याही पुढे श्रृष्टि आहे"
"तुज्या बुधिच्या पलिकडेही बरयाच गोष्टी घडत असतात
आशेचे तुटलेले धागे तुज्या नकळत जोडत असतात"

                               "तुझ्या नकळत तुज्यासमोर, असा एक क्षण येइल,
                               ज्याची आशा सोडली होतीस, ते स्वप्न खरे होइल"

"म्हणून....सगले रस्ते बंद होतील
तेव्हां फक्त 'विश्वास ठेव'
जिथे संपते मर्यादा तुझी,
तिथून साथ देतो देव !!"
---------------------------------------------------------------------------------------------

माझे मन तूझे झाले



माझे मन तूझे झाले
तुझे मन माझे झाले
माझे प्राण तूझे प्राण
उरले ना वेगळाले ॥

मला लागे तुझी आस
तुला जडे माझा ध्यास
तुला मला चोहीकडे
माझे तूझे होती भास ॥


माझ्यातून तू वाहसी
तुझ्यातही मी पाहसी
तूझ्यामाझ्यातले सारे
गुज माझ्यातुझ्यापाशी ॥

तुझी माझी पटे खूण
तुझी माझी हीच धून
तूझे प्राण माझे प्राण
माझे मन तूझे मन ॥
--------------------------------------------------------------------------------------------








No comments:

Post a Comment